Breaking News
Home / कलाकार / होळीच्या या सीनमुळे सुपरहिट झाले होते हे ५ सिनेमे, काही अभिनेत्यांनी तर हिरोईन सोबत

होळीच्या या सीनमुळे सुपरहिट झाले होते हे ५ सिनेमे, काही अभिनेत्यांनी तर हिरोईन सोबत

आपल्या देशात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आनंदाचे क्षण देणारा हा क्षण अनेक जातीचे धर्माचे लोक देखील साजरा करतात. याच सणाचा महत्त्वपूर्ण परिणाम बॉलिवूडमध्येही पाहायला मिळतो. होळी सणा ला चित्रपटांमध्ये देखील विशेष स्थान दिले गेले आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यात होळीचा सण दर्शविला गेला व तो थाटामाटात साजरा केला आणि त्यामुळे देखील आजपर्यंत लोकांच्या मनात हा सन आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही होळीच्या दृश्यांविषयी सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटाला हिट बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.दिवाना : शाहरुख खान आणि दिव्या भारती यांच्या चित्रपटामध्ये शाहरुख दिव्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करणारे एक दृश्य आहे. त्यानंतर पांढऱ्या साडीवर लाल गुलाल फेकतो शाहरुख फेकतो. या दृश्यानंतर चित्रपटाची संपूर्ण कहाणी उलटली आहे. त्यामुळेच आजपर्यंत लोकांना हा सिन आठवतो. शोले : बॉलिवूडमधील सर्वाधिक चाललेल्या शोले चित्रपटात होळीवर एक गाणे चित्रित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे ‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ हे गाणे खूप प्रसिद्ध आहे. या गाण्यादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचा रोमान्स दर्शविला गेला आहे.सिलसिला : सिलसिला या चित्रपटात स्वत: अमिताभ बच्चन यांनी ‘रंग बरसे भिगे चुनार वाली’ हे गाणे गायले आहे जे खूप प्रसिद्ध आहे. आजही तुम्ही हे गाणे होळी च्या सणादिवशी ऐकलेच असेल. या गाण्यापूर्वी एक सीन आहे. ज्यामध्ये जया, अमिताभ, रेखा आणि संजीव कुमार रंगात रंगले आहेत. मग रेखा जयाकडे जाते आणि म्हणते की तिने आपल्या प्रिय पुरुषाशी लग्न केले नाही. अमिताभ बच्चन देखील संजीव कुमार यांना चित्रपटात असेच म्हणतात. या दृश्यानंतर संपूर्ण चित्रपटाची कहाणी उलटली आहे.मोहब्बतें : शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या मोहब्बतें या ब्लॉकबस्टरवर चित्रपटाने होळीच्या सनावर बरेच सीन केले असून या गाण्याचे शूटदेखील झाले आहे. ‘मोहब्बतें’ चित्रपटात परंपरा मोडत प्रत्येकजण होळीचा सण साजरा करताना दिसला आहे. चित्रपटाचा एक सिन खूप प्रसिद्ध होता ज्यात शाहरुख खानने अमिताभ बच्चनच्या कपाळावर गुलालाने टिळा लावला. या चित्रपटाची गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत.गोलियों की रासलीला-रामलीला : या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी होते. या चित्रपटात दीपिका आणि रणवीरचा रोमान्स दिसून आला आहे, जो लोकांना खूपच आवडला. चित्रपटाच्या ‘लहू मुंह लग गया’ या गाण्यात दीपिका आणि रणवीर एकमेकांच्या भूमिकेत आहेत. या सीनमध्ये दोघेही किस करताना दिसत आहेत. रणवीर आणि दीपिकाचा हा चित्रपट फार जुना नाही आहे काही वर्षयांपूर्वीचाच आहे. या चित्रपटाच्या वेळी रणवीर आणि दीपिकाची जोडी खूप जास्त चर्चेत होती आणि लोकांना ती आवडू देखील लागली होती.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

आधी आईवर केलं प्रेम आता तिच्याच मुलीसोबत सलमान खान करणार

१९८९ ला आलेला सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट “मैने प्यार किया” मध्ये सलमान आणि भाग्यश्री एकत्र रोमांस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *