Breaking News
Home / कलाकार / साखरपुडा झाला असून सुद्धा यांचं होऊ नाही शकलं लग्न, सलमानच्या पत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या

साखरपुडा झाला असून सुद्धा यांचं होऊ नाही शकलं लग्न, सलमानच्या पत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपे होती जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. यापैकी अनेक जोड्या जश्या चित्रपटांमध्ये शोभून दिसायच्या तशाच लोकांना ते खऱ्या आयुष्यात एकत्र असावे असे देखील वाटत होते. अनेक स्टार्सनी त्यांचे प्रेम आयुष्यभर टिकावे म्हणून लग्ना पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण काही कारणांमुळे ही नाती तुटली आणि लग्न होऊ शकले नाही. आम्ही तुम्हाला काही अशी जोडपी सांगणार आहोत जी खूप प्रयत्न करूनही एकमेकांना भेटू शकली नाहीत आणि साखरपुडा होऊन देखील काहींचे लग्न होऊ शकले नाही.संगीता बिजलानी आणि सलमान खान : संगीता बिजलानी आणि सलमान खानचे अफेअरही त्यावेळी खूप चर्चेत होते. १९८६ मध्ये ते एकमेकांच्या खूप जवळ आले आणि सुमारे १० वर्षे एकमेकांना ते डेट करत होते. असं म्हणतात की सलमान आणि संगीता बिजलानीच्या लग्नाची तारीख देखील निश्चित होती. एवढेच नव्हे तर लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. परंतु त्यादरम्यान संपूर्ण नात्यात फूट पडली कारण अभिनेत्री सोमी अली सलमान खानच्या आयुष्यात आली. संगीताला जेव्हा सलमान व सोमी अली चे जवळचे संबंध समजले तेव्हा तिने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि नंतर क्रिकेटर अझरुद्दीनशी लग्न केले.अक्षय कुमार आणि रवीना टंडन : एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार आणि रवीना टंडनचे अफेअर चर्चेत होते, पण अक्षयचा ब्रेकअप रेखाबरोबरच्या लिंकअपमुळे झाला. यानंतर अक्षय आणि शिल्पा शेट्टीच्या अफेअरची खूप चर्चा झाली. दरम्यान, एका मुलाखतीत रवीनाने सांगितले होते की अक्षयने शिल्पाशी आणि इतर दोन मुलींशी देखील साखरपुडा केला होता. त्यानंतर रवीना आणि अक्षय यांनी आपापले स्वतंत्र साथीदार निवडले.अभिषेक आणि करिश्मा : अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा देखील साखरपुडा झाला होता. पण या दोन कुटुंबांना एकमेकांची साथ मिळाली नाही आणि हे संबंध तुटले. या नात्याचा ब्रेकअप झाल्यानंतर अभिषेक वाईटरित्या तुटला आणि त्याच वर्षी करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केले.विवेक ओबेरॉय आणि गुरप्रीत गिल : ऐश्वर्या राय, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील त्रिकोणी वाद सर्वांनाच आठवत असेल. पण खर पाहिलं तर अभिनेता विवेकचे नावही गुरप्रीत गिलशी जोडले गेले होते. त्या दोघांनाही बर्‍याचदा एकत्र पाहिले. पण या जोडप्याचे नाते फार काळ टिकले नाही. नंतर दोघे वेगळे झाले आणि विवेक ओबेरॉय यांनी २०१० साली प्रियंका अल्वाशी लग्न केले.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

अजय आणि रवीना ने एकत्र ६ सिनेमे केले, पण जास्त सिनेमे फ्लॉप ठरले

एकेकाळी अजय देवगन आणि रवीना टंडन एकत्र चित्रपट करायचे. पण आज जिथे अजय एक मोठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *