Breaking News
Home / कलाकार / अमिताभ बच्चन ने केले गुपित उघड, या प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी माझे प्राण वाचवले

अमिताभ बच्चन ने केले गुपित उघड, या प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी माझे प्राण वाचवले

शिवसेना पक्षाचे प्रमुख असलेले बाळासाहेब ठाकरे यांना कोण नाही ओळखत. हे दुर्दैव्य आहे कि ते या जगात आता राहिले नाहीत, पण आज देखील त्यांच्या नावाचा तेवढाच दरारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना बाळ ठाकरे ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी आणि हक्कासाठी खूप कामे केली आहेत. म्हणून मराठी लोकं त्यांना देव मानतात आणि त्यांची देवासारखीच पूजा करतात. त्यांचा लोकांसाठी असलेला स्वभाव मित्रांसारखा होता. ते सर्वाना मित्रा प्रमाणे वागणूक देत असत आणि अडचणींमध्ये नेहमी पुढे धावून येत होते.अमिताभ बच्चन आपल्या काही क्षणांना आठवून सांगतात कि, बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्यासाठी नेहमी एका परिवारासारखे राहिले आहेत, जेव्हा-जेव्हा मला मदत लागली आणि माझ्या वाईट काळामध्ये मला बाळासाहेबांनी नेहमी साथ दिला. बाळासाहेब ठाकरेंवर सध्या एक चित्रपट बनत आहे ज्यामध्ये बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दकी करणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर लाँचसाठी अमिताभ बच्चन उपस्थित होते. भासहन देत असताना त्यांनी सांगितले कि, बाळासाहेब त्यांचे खूप चांगले मित्र होते आणि पुढे त्यांनी सांगितले कि शिवसेना प्रमुखांनी कश्याप्रकारे त्यांच्यी मदत केली आणि हे सांगत असताना त्यांना बाळासाहेबांची कमतरता वाटू लागली आणि सर्व भारावून गेले.अमिताभ यांनी सांगितले कि त्यांना व त्याच्या परिवाराला बोफोर्स घोटाळ्यामध्ये फसवले गेले होते. त्यावेळी फक्त बाळासाहेबांनीच त्यांना ह्या अडचणींमधून बाहेर काढलं होत. त्यांनी भासहन देतांना सांगितले कि बाळासाहेबांनी त्यांना संपूर्ण खरी घटना विचारली आणि सत्य काय आहे हे जाणून घेतले, तर त्यावर अमिताभने सांगितले कि ही गोष्ट सत्य नाहीये. बाळासाहेबांनी परत प्रश्न केला कि, तुम्ही खरं बोलताय ना तर अमिताभने त्यावर सांगितले कि हो मी अगदी खार बोलत आहे आणि बाळासाहेब म्हणाले कि मग आता तुमच्या घाबरायची काहीही गरज नाहीये, जे काही होईल मी सर्व सांभाळून घेईल, मी तुमच्या सोबत आहे. एवढच नाही तर अमिताभ ने सांगितले कि, कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना जखम झाली होती तेव्हा देखिल बाळासाहेब सर्वात पहिले तिकडे हजर होते.अमिताभ ने पुढे सांगितले कि, त्या दिवसात मी फ्लाईटने बंगळुरूहुन मुंबईला आलो होतो. पाऊस खूप पडत होता, त्यामुळे कुठली रुग्णवाहिका पण भेटत नव्हती आणि त्यावेळेस माझी परिस्थिती खूप गंभीर होती व बाळासाहेबांनीच माझ्यासाठी शिवसेनेची रुग्णवाहिका पाठवली होती. जया सोबत लग्न केल्यांनतर पण बाळासाहेबांनी अमिताभला घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. जेव्हा २०१२ साली बाळासाहेबांचे निधन झाले तेव्हा तो काळ अमिताभ साठी सर्वात दुःखद होता. त्यांनी कधीच बाळासाहेबांना असे बेडवर झोपलेले पाहिले नव्हते. जेव्हा ते बाळासाहेबांच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये बाजूला जाऊन बसले तेव्हा त्यांनी पाहिले कि, बाळासाहेबांनी आपल्या घरात माझ्यासोबत काढलेला एक फोटो फ्रेम करून ठेवला होता आणि अमिताभ नेहमी सांगतात कि बाळासाहेब माझ्या वडिलांप्रमाणे आहे आणि मला त्यांची कमतरता अजून सुद्धा भासते.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

आधी आईवर केलं प्रेम आता तिच्याच मुलीसोबत सलमान खान करणार

१९८९ ला आलेला सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट “मैने प्यार किया” मध्ये सलमान आणि भाग्यश्री एकत्र रोमांस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *