Breaking News
Home / कलाकार / बाहुबली अभिनेत्री अनुष्का शेट्टी चित्रपटाच्या शुटिंच्या वेळी झाली दुर्घटनेची शिकार

बाहुबली अभिनेत्री अनुष्का शेट्टी चित्रपटाच्या शुटिंच्या वेळी झाली दुर्घटनेची शिकार

कोणत्याही चित्रपटासाठी एका अभिनेत्याला किती कष्ट घ्यावे लागतात याचा अंदाज काहीच चाहते लावू शकतात. फक्त कष्टच नाही तर अनेक सिन ना परफेक्ट आणि खरे वाटावे यासाठी कलाकार आपला जीव देखील पणाला लावतात. तुम्ही अनेकदा पहिले असेल कि अनेक अभिनेते चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर जखमी झाले आहेत तर काही मारता मारता देखील वाचले आहेत. अनेकांनी तर शूटिंगच्या वेळी प्राण देखील गमावले आहेत. आज आम्ही बाहुबली मधल्या अभिनेत्रीबद्दल बद्दल सांगणार आहोत जी शुटिंच्या वेळी झाली दुर्घटनेची शिकार झाली आहे.आम्ही बोलत आहोत साऊथची गाजलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी विषयी. अनुष्का ने आपल्या बाहुबली चित्रपटातून संपूर्ण भारतात तर प्रसिद्धी मिळवलेच त्यासोबतच तिने परदेशातही आपली ओळख बनवली. आता माहिती मिळाली आहे कि, अनुष्का शेट्टी शुटिंगदरम्म्यान जखमी झाली आहे. लवकरच अनुष्का ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्कासोबत अभिनेता चिरंजीवी दिसणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अनुष्कासोबत अपघात झाला आहे ज्यामुळे ती जखमी झाली.

शूटिंगच्या वेळी गंभीर जखमी झाल्याने अनुष्काच्या पायाच हाड मोडलं आहे. अनुष्काला फॅक्चर झालं असून डॉक्टरांनी अनुष्काला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या अनुष्का आराम करत आहे बारी होताच ती पुन्हा शूटिंग सुरु करणार आहे. अनुष्का पहिल्यांदा शूटिंगच्या वेळी इतकी गंभीर जखमी नाही झाली तर यापूर्वी बाहुबली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देखील ती गंभीर जखमी झाली होती. बाहुबली मध्ये अनुष्का आणि प्रभास यांची जोडी खूप गाजली होती. अनुष्काचा आगामी चित्रपट २ ऑक्टोबर ला प्रदर्शित होणार आहे.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

आधी आईवर केलं प्रेम आता तिच्याच मुलीसोबत सलमान खान करणार

१९८९ ला आलेला सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट “मैने प्यार किया” मध्ये सलमान आणि भाग्यश्री एकत्र रोमांस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *