Breaking News
Home / माहिती / फेसबुकमुळे महिलेला गमवावे लागले प्राण, फोटोवर क्लिक करून वाचा सविस्तर

फेसबुकमुळे महिलेला गमवावे लागले प्राण, फोटोवर क्लिक करून वाचा सविस्तर

आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हे खूप प्रगत झाले आहे. तरुणपिढी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. फेसबुक हे खूप मोठे सोशल नेटवर्क आहे ज्याद्वारे लोक एकमेकांशी मैत्री करतात व चॅट देखील करतात. मात्र या सोशल साइट्समुळे अनेक फायदे देखील जाहले आहेत तर नुकसान देखील झाले आहेत. सोशल साइट्समुळे अनेकांची फसवणूक झाली आहे आणि अनेकांनी तर जीव देखील गमावला आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे ज्यामध्ये ४० वर्षीय महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत.आनंद निकम नावाच्या ३१ वर्षीय तरुणाचा पुण्यातील रेंज हिल्स या एरियामध्ये चहाचा स्टॉल आहे. जवळपास साडेचार महिण्याआधी आनंद या तरुणाने राधा अग्रवाल या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. राधाने देखील त्याला आपले मित्र बनवले होते. आनंदला राधा हि श्रीमंत असल्याचे माहित होते त्यामुळे त्याने तिच्याशी मैत्री केली. आनंद आणि राधा सतत एकमेकांना भेटत होते यामुळे त्यांची मैत्री वाढत गेली आणि प्रेम जडले. एके दिवशी २२ जून २०१९ रोजी आनंदने राधाला सांगितले कि आपण बाहेर फिरायला जाऊ आणि तिकडे फोटो काढू.फोटो चांगले यावेत यासाठी आनंदने राधाला सांगितले कि तू भरपूर दागिने देखील घालून ये. राधाच्या स्कुटीवर दोघे ताम्हिणी घाटाकडे चालले. राधाचे खूप फोटो काढल्यानंतर आनंद म्हणाला आपण वेगळ्या पद्धतीचे काही फोटो काढू यासाठी आनंदने तिचे हात झाडाला बांधले तसेच डोळ्यावर पट्टी बांधली. प्रेमामध्ये असलेल्या राधाने देखील त्याचे ऐकले व त्याला प्रतिसाद दिला. मात्र मनात स्वार्थाची भावना असलेल्या आनंदने राधाचा गाला कापला आणि तिचे दागिने घेऊन पसार झाला. राधाला १९ वर्ष्याच्या मुलगा आहे त्याने आई बेपत्ता असल्याची तक्रार मूढाव पोलीस ठाण्यात केली. राधाच्या फोन रेकॉर्डची तपास करून पोलिसांनी आरोपी आनंद यास ताब्यात घेतले तसेच आरोपी आनंद याने डोक्यावर असलेले दोन लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी असे केल्याचे देखील कबुल केले. यामुळे नेहमी सोशल साईट्स वापरताना सतर्क राहा.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

मलाला म्हणाली पाकिस्तानला द्या काश्मीर, भारतीच्या या खेळाडू ने केली बोलती बंद

पाकिस्तानच्या नोबेल पुरस्कार विजेती ‘मलाला यूसुफजई’ हिने काश्मीर प्रश्नावर दिलेल्या विधानाला भारतीय नेमबाज हिना सिद्धू …

One comment

  1. CHINTAMANI Jamd

    Nice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *